सर्वपल्ली ङॉ. राधाकृष्ण्ान यांचा जन्म दिवस शिक्ष्ाक दिन म्हणुन साजरा केला जातो. गावामध्ये तंटामुक्त समीती अंतर्गत शिक्ष्ाक दिन साजरा करण्यात येतो. या दिवशी गुणी विद्यार्थी व सेवानिवृ्त्त शिक्षकांचा सत्कार करण्यात येतो. तसेच या दिवशी व्याख्यानांचे आयोजन केले जाते व त्यातून सर्व धर्म समभाव, समानतेचा संदेश घेउन येणारी नविन पिढी उदयास यावी, जाती धर्मातील भेद-भाव दूर व्हावेत हे संदेश दिले जातात.
