मौजे कणेरीवाडी येथे पुरातन मंगादेवी मंदिर आहे. या ठिकाणी नवरात्र उत्सवात ९ दिवस दुर्गा मातेची उपासना अतिशय भक्तीभावाने केली जाते. यामुळेच कणेरीवाडी गावामध्‍ये सुद्धा दुर्गादेवी उत्‍‍सव तंट‍ामुक्‍‍त समि‍तीच्‍या वतीने अत्‍‍यंत उत्‍‍साहाने साजरा केला जातो. या ९ दि‍वसामध्‍ये व्‍यसनमुक्‍‍ती, बालवि‍वाह आदी कार्यक्रमांचे सजीव देखाव्‍याद्वारे नाट‍ीका सादर करण्‍यात येतात. तसेच दांडीयाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. दस-याच्या दुस-या दिवशी मुर्तीचे वि‍र्सजन केले जाते. मुर्तीचे वि‍र्सजन प‍ोलीस बंदोबस्ताशिवाय ग्राम सुरक्षा दलाच्‍या सहकार्याने शिस्‍तबद्ध्‍ा प‍ार प‍ाडले जाते.